सात वर्षांपूर्वी दोन हजार रुपये देऊन विकत घेतलेले ते दोन ‘बाँड’ आज अतिशय महत्त्वाचे ‘दस्त’ बनले आहेत...
हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून न्यूज चॅनल्स चालवणाऱ्यांना जे जमलं नाही, ते त्या शोधपत्रकारिता करणाऱ्या तरुणीने फक्त दोन हजार रुपयांची गुंतवणूक करून एखाद्या बातमीमागील बातमी कशी शोधावी, हे दाखवले आहे. असे शोधपत्रकारिता करणारे पत्रकार आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आणि गुपिते समोर येतील. पत्रकारिता करणाऱ्या नवीन पिढीला निश्चितच मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणा देणारी ही घटना आहे.......